Maharashtra : शिंदे सरकारचा उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का, जलसंधारण विभागाची कामे थांबवली
Maharashtra : शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिलाय. जिल्हा नियोजन निधीच्या पाठोपाठ जलसंधारण विभागाची कामे नव्या सरकारकडून थांबवण्यात आली आहेत.

Maharashtra : शिंदे-फडणवीस सरकारकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका मागून एक धक्के दिले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिलाय. जिल्हा नियोजन निधीच्या पाठोपाठ जलसंधारण विभागाची कामे नव्या सरकारकडून थांबवण्यात आली आहेत.
नव्याने काढलेल्या सर्व निविदा रद्द करण्याचा निर्णय शिंदे- ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने 4037 कामांच्या निवीदा काढल्या होत्या. परंतु, या सर्व निवीदा आता रद्द होणार आहेत. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील निविदा प्रक्रियेच्या सर्व स्तरावरील सर्व कामांच्या निविदा रद्द करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने निविदा कार्यवाहीततील कोणत्याही कामांच्या निविदा अंतिम करण्यात येवू
नयेत. तसेच निविदा अंतिम झालेल्या कोणत्याही कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येवू नयेत. रद्द करण्यात आलेल्या निविदांची ( प्रकल्पनिहाय ) तालुकानिहाय यादी सर्व संबंधित जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी परस्पर शासनास सादर करावी, असे सूचाना आज काढलेल्या परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने कालच महाविकास आघाडी सरकारला एक धक्का दिला होता. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये केलेल्या तीन बदल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून रोखण्यात आल्या आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेत आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची बदली करण्यात आली होती. याबरोबरच औरंगाबादचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची सिडकोमध्ये दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे- फडणवीस सरकारने रोखल्या आहेत.
गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठारेंना धक्के
- शिंदे-फडणवीस सरकार, 40 आमदार फोडले
- विधिमंडळात प्रतोद आणि गटनेतेपदी शिंदे गटाची वर्णी
- मेट्रोचं कारशेड कांजूरऐवजी आरेमध्येच होणार
- जलयुक्त शिवार योजना सुरु करण्याची तयारी
- नाशिक जिल्ह्याचा ५६८ कोटींचा निधी थांबवला
- जिल्हा नियोजन समितीचा १३ हजार कोटींच्या निधीला स्थगिती
- मविआच्या काळातील शेवटच्या तीन बदल्यांना स्थगिती
- ठाणे पालिकेतील ६६ नगरसेवक शिंदे गटात
- नवी मुंबई पालिकेतील ३३ नगरसेवक शिंदे गटात
- मुंबईतील मागाठाणे येथील शाखाप्रमुखांचे राजीनामे
- शेटवच्या कॅबिनेटमधील तीन बदल्यांना स्थगिती
- जलसंधारण विभागाची कामे थांबवली
महत्वाच्या बातम्या
Maharashtra : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, 'मविआ' सरकारने केलेल्या बदल्या रोखल्या























