एक्स्प्लोर

Maharashtra Politics Devendra Fadnavis: महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis:  महाविकास आघाडीचा पोपट मेला असून फक्त कार्यकर्त्यांसाठी नेते वक्तव्ये करत असल्याचा टोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis:   सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर (Supreme Court Verdict) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावं लागत असल्याची टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. फडणवीस यांनी म्हटले की, 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मी काहीच बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे तो निर्णय विधानसभा देतील. मात्र एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्ष विधानसभेत काम केले म्हणून मी मला असे वाटते की आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावं लागत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत आणि कोणी कसे बसायचे कोणी कुठे उभे राहायचे कोणी बोलायचं यामध्ये वाद सुरू आहेत. हा नेत्यांच्या बद्दल पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधक आहोत त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधी ?

फडणवीस यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत. लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील. तर, विधानसभेच्या निवडणुका विधानसभेचा कार्यकाळ झाल्यानंतर होतील. लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ. त्यानंतर अधिकच काम करून आम्ही विधानसभेमध्ये निवडणुका जिंकू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

महापालिका निवडणुकांचं काय ?

महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये निकाल येईल.  ऑक्टोबरमध्ये निवडणूक होतील असा अंदाज मी व्यक्त केलेला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. याआधी भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. 

फक्त बारामती नाही तर 48 लोकसभा मतदारसंघावर लक्ष

बारामती लोकसभा मतदारसंघावर पत्रकारांच जास्त लक्ष असतं. आम्हाला आम्ही पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघावर लक्ष देत आहोत तेथे केंद्रीय नेत्यांचे सातत्याने दौरे होत आहेत. बारामती त्यापेक्षा काही वेगळे नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्यापुढे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार करता येणार नाही सर्व जिल्ह्यांचा एकच विचार करावा लागेल असेही त्यांनी म्हटले. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget