एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश; विशेष अधिवेशन बोलावले

Maharashtra Floor Test: राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Floor Test: मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे." 

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली. 

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले.  मग तिथून ते हे सगळे आमदार आसाममधल्या गुवाहाटीत पोहोचले.  

सत्तासंघर्षाबाबत सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी फक्त एक क्लिक करा, वेगवान आणि अचूक घडामोडींसाठी पाहा 'एबीपी माझा'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत - प्रकाश आंबेडकरLok Sabha Seat Sharing Conflicts : प्रत्येक पक्षात एकच आवाज, मै भी नाराज! युती-आघाडीत नाराजीचं पेवTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  06 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
Embed widget