एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 16 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

LIVE

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Background

Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 831 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8395 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 30,547 ॲक्टिव कोरोना रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 8 हजार 695 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 76 लाख 69 हजार 772 इथकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.73 टक्के इतके झाले आहे. राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,66,39,114 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,47,746 (10.24 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,14,531 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1544 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉनचे 351 नवे रुग्ण –
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ओमायक्रॉनचे नवीन 351 रुग्ण आढळले आहेत.  आज आढळलेल्या रुग्णापैकी 280 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि 71 रुग्ण  बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये औरंगाबादमधील प्रमाण सर्वाधिक आहे. औरंगाबादमध्ये 148 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. तर नाशिक 111,  पुणे मनपा 72, पुणे ग्रामीण 12, पिंपरी चिंचवड 5, यवतमाळ 2 आणि साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे.  राज्यात आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णामुळे एकूण रुग्णांची संख्या 4245 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 3334 जणांना ओमायक्रॉनवर मात केली आहे.

मुंबईत रुग्णसंख्येत किंचित वाढ

मुंबईत (Mumbai) आज नवे 235 कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) काहीशी अधिक आहे, कारण सोमवारी 192 नव्या बाधितांचीच नोंद झाली होती. पण आज मुंबईत एकाही रुग्णाचा मृच्यू न झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 235 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 446 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 301 इतकी झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन 0.04% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसंच आज नव्याने सापडलेल्या 192 रुग्णांपैकी 38 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 853 बेड्सपैकी केवळ 972 बेड वापरात आहेत.

मागच्या काही दिवसापासून कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दररोज घट होताना दिसत होत. मात्र, आज कालच्यापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या थोडी वाढली हे. गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 514 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल देशात  27 हजार 409 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कालच्यापेक्षा आज 3 हजार 206 जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. 

सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 3 लाख 7 हजार 240 झाली आहे. केद्रीय आरोग् मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 9 हजार 872 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 कोटी 18 लाख 43 हजार 446 लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.

23:59 PM (IST)  •  16 Feb 2022

कर्नाटकात आज 1,894 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कर्नाटकात आज 1,894 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5,418 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

23:58 PM (IST)  •  16 Feb 2022

आसाममध्ये आज 55 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आसाममध्ये आज 55 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

23:58 PM (IST)  •  16 Feb 2022

दिल्लीत आज 766 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दिल्लीत आज 766 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

20:21 PM (IST)  •  16 Feb 2022

आज अकोल्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज अकोल्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 192 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

19:49 PM (IST)  •  16 Feb 2022

गेल्या 24 तासात राज्यात 2 हजार 748 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत  आज  रुग्णसंख्या किंचीत वाढली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5 हजार 806  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget