Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायला सुरुवात? विदर्भात कोरोनाचा उद्रेक वाढला!
कोरोनाची वाढता संसर्ग पाहता महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये शनिवार व रविवार लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबई : राज्यातील नागपूरसह विदर्भाच्या 5 जिल्ह्यात दोन दिवसांचा शनिवार व रविवार लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यात अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला यांचा समावेश आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये आता सात दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व बाजारपेठांसह सर्व शासकीय कार्यालये दोन दिवस बंद राहतील. प्रशासनाने केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. म्हणजे दूध, भाज्या, पेट्रोल पंप व मेडिकल स्टोअर खुले राहतील. शहरातील सर्व शॉपिंग मॉल्सलाही बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जेणेकरुन लोकांची गर्दी रोखता येईल.
शहरातील लोकांनाही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणी घराबाहेर पडले तर त्याला योग्य कारण द्यावे लागेल अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आज नागपुरात लॉकडाऊन दरम्यान नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरात फिरुन नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी आणि कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी दोन दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. विदर्भातील अमरावती जिल्हा कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहे. 5 दिवसातच या जिल्ह्यात कोरोनाच्या 4061 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनामुळे 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, शुक्रवारी नागपूरमध्ये कोरोना बाधित 1074 नवीन रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात जनता कर्फ्यूची जाहीर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातही कोरोनाच्या वाढत्या केसेसचा विचार करता जनता कर्फ्यू जाहीर केला. सध्या महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग सातत्याने वाढत आहे. मुंबईतही कोरोनाचा वेग वाढत आहे. एका आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला गर्दी टाळण्याचे, मास्क घालण्याचे, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाची प्रकरणे वाढल्यास लॉकडाउनसाठीही तयार राहण्यास त्यांनी सांगितले होते.
अमरावतीमधील लॉकडाऊन आणखी वाढवला अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी सात दिवसांसाठी वाढवला आहे. लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 22 फेब्रुवारी रात्रीपासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. परंतु हा टप्पा पूर्ण होण्याच्या आधीच लॉकडाऊनचा कालावधी आणखी सात दिवसांनी वाढवण्यात आला आहे.
अद्याप कोरोना रुग्णांमध्ये कपात नाही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला एक आठवडा झाला. मात्र, कोरोना केसेस कमी होताना दिसत नाही. उलट काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन सुरू झाले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी लावली जाऊ शकते का? हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Amravati Lockdown | अमरावतीकरांकडून कोरोना नियम पायदळी, नागरिकांना कोरोनाचा धाक नाहीच