एक्स्प्लोर

Corona Virus: शक्य असेल तिथं 'वर्क फ्रॉम होम' सुरु ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही

मी जबाबदार! ही एक नवी मोहिम राबवूया. घराबाहेर पडताना मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, कार्यालयीन वेळा बदलणं या साऱ्याचा यात समावेश.

Corona Virus राज्यात साधारण वर्षभरापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. साधारण वर्षभराच्या नियम आणि निर्बंधांनंतर राज्यात अखेर अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. टप्प्याटप्प्यानं देण्यात आलेल्या या शिथिलतेमध्ये समावेश होता दुकानांच्या वेळा, उपहारगृह सुरु करण्याची मुभा आणि अखेर निर्धारित वेळांमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकलच्या प्रवासाची मुभा. तिथं लोकल सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय ठाकरे सरकारनं दिला आणि इथं अनेक कार्यालयं पुन्हा सुरु करण्यात आली. पण, आता मात्र वर्क फ्रॉम होम, या सुविधेलाच प्राधान्य देत शक्य त्या परिनं संपर्क टाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे.

राज्यातील जनतेला कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये त्यांनी अधोरेखित केलेली एक बाब म्हणजे कार्यालयीन वेळांची विभागणी.

राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत आपण काही सूचना केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ऑफिसच्या वेळा विभागणे हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिवसाच्या 24 तासांचा उपयोग योग्य पद्धतीनं करत वेळेची विभागणी करण्यावर त्यांनी भर दिला.

ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही त्यांना वर्क फ्रॉम होम द्या...

संपर्क टाळण्यासाठी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही त्यांना वर्क फ्रॉम होम ही सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही दिसले. त्यातही तुकड्या करत ऑफिसमधील विभागांमध्ये ही सुविधा सोयीनुसार देण्याचा सल्ला त्यांनी दिला. सोबतच रेल्वे, खाण्याची ठिकाणं आणि इतरही काही ठिकाणांवर कारण नसताना होणारी गर्दी टाळण्याचा मुद्दा उचलून धरला.

वर्क फ्रॉम होममध्येही ऑफिसच्या वेळांची विभागणी करत त्यांनी ‘मी जबाबदार’ ही मोहिम राज्यातील नागरिकांना हाती घेण्याचं आवाहन केलं.

कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज : मुख्यमंत्री

मी जबाबदार! ही एक नवी मोहिम राबवूया. घराबाहेर पडताना मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, कार्यालयीन वेळा बदलणं या साऱ्याचा यात समावेश, असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी पुढील काही दिवस कोरोना लढ्यातील अतिशय महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत हा इशारा जनतेला दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
Maharashtra Breaking LIVE: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; दादर, कुर्ला, सायनसह अनेक भाग जलमय
Maharashtra Breaking LIVE: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; दादर, कुर्ला, सायनसह अनेक भाग जलमय
Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget