एक्स्प्लोर

Maharashtra Corona LIVE Updates : राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता

Maharashtra Covid-19 Cases Lockdown Updates : राज्यातील कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊन संबंधित अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

LIVE

Key Events
Maharashtra Corona LIVE Updates : राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता

Background

मुंबई : राज्यात गुरुवारी 21,273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 34,370 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 425 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 3,01,041 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  

आजपर्यंत एकूण 52,76,203 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 425 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,40,86,110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,72,180 (16.64 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 22,18,278  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,996  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

सरकारी आकडेवारीनुसार राज्यात मागील 24 तासात चंद्रपूर शहर, गोंदिया जिल्हा,अमरावती शहर, अकोला शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली, जालना, औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा, जळगाव शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, मालेगाव शहर, वसई विरार शहर, पालघर जिल्हा, मीरा भायंदर शहर, भिवंडी शहर या ठिकाणी कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद नाही.  

मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान

मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6,57,301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 351 दिवसांवर गेला आहे.  मुंबईत सध्या 28,310 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  मुंबईत काल 1,362 रुग्णांचे निदान झाले होते तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.  

पुणे शहरात दिवसभरात नवे 588 कोरोनाबाधित! 

पुणे शहरात आज नव्याने 588 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 68 हजार 129 इतकी झाली आहे. शहरातील 921 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51  हजार 991 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 193 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24  लाख 68 हजार 709 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 7 हजार 990 रुग्णांपैकी 996 रुग्ण गंभीर तर 1862 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 33 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 148 इतकी झाली आहे.

राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय, काही ठिकाणी नियम शिथिल करणार : राजेश टोपे

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील अशी माहितीही त्यांनी दिली. 

कोरोना व्हायरस नव्या प्रकारचा आहे, तो मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे हटवता येणार आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता देता येईल याबाबतचे बारकावे तपालसे जातील, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. 

21:17 PM (IST)  •  28 May 2021

दहावीच्या परीक्षेसंदर्भात हायकोर्टात भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं  मागितली मुदतवाढ

दहावीच्या परीक्षेसंदर्भात हायकोर्टात भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं  मागितली मुदतवाढ,

तर बारावीच्या परिक्षा घ्यायच्या की नाहीत यावर अद्याप निर्णय घेणं बाकी, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या निर्णयाची राज्य सरकारला प्रतिक्षा,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात केवळ 15 टक्के कर्मचारीवर्गाची उपस्थिती असल्याचं कारण पुढे,

हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार या आठवड्यात राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र दाखल होणं आवश्यक होतं,

19:57 PM (IST)  •  28 May 2021

महाराष्ट्रात आज 31,671 रुग्णांना डिस्चार्ज तर 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Corona update : महाराष्ट्रात आज 31,671 रुग्णांना डिस्चार्ज तर 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, राज्याचा रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर  

19:35 PM (IST)  •  28 May 2021

मुंबईत मागील 24 तासात कोरोना रुग्णाचा आकडा हजाराच्या आत

Mumbai Corona update : मुंबईत मागील 24 तासात कोरोना रुग्णाचा आकडा हजाराच्या आत, 1239 रुग्णांना डिस्चार्ज, रुग्ण दुपटीचा दर 370 दिवसांवर #corona #mumbai 
19:29 PM (IST)  •  28 May 2021

Maharashtra lockdown update : राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता

Maharashtra lockdown update : कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जून पर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जून पासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती आहे.

09:42 AM (IST)  •  28 May 2021

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना महिन्याला पाच हजार रुपये देण्याचा राज्य सरकारचा विचार

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना महिन्याला पाच हजार रुपये देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या अनाथ मुलांच्या खात्यात काही रक्कम डिपॉझिट ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव असून त्यातून त्या मुलांना महिन्याला एक ठराविक रक्कम मिळू शकेल. या अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी असाही प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.  याबाबत आज महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा होणार असून त्यानंतर निर्णय जाहीर होईल. याआधी मध्य प्रदेश सरकारने या मुलांना अशा पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतला होता.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget