Maharashtra Corona Update : गुरुवारी राज्यात 128 नव्या रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 128 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात राज्यात 159 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,26,184 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 828 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 6 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,96,09,229 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,74,818 (09.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईतील महिलेला XE व्हेरियंटची लागण?
बुधवारी बीएमसीने मुंबईत एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. एक्सई व्हेरीयंट रुग्ण महिला मूळची दक्षिण आफ्रिकन असून वय वर्ष 50, दोन्ही लसीचे डोस पूर्ण सोबतच कोणतीही लक्षणं नव्हती. एक्सई व्हेरीयंट रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून 10 फेब्रुवारी रोजी भारतात आली होती. लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. भारतात आल्यावर रुग्ण निगेटिव्ह होता मात्र दोन मार्च रोजी रुटिन टेस्ट केल्यावर कोव्हिड पॉझिटिव्ह आढळली. अशात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी रुग्णाची चाचणी केल्यानंतर रुग्ण निगेटिव्ह आली होती.
24 तासात देशात 1 हजार 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
देशात सध्या कोरोनाचा धोका कमी झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात कोरोनामुळं 43 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, काल देशात 1 हजार 86 रुग्णांची नोंद झाली होती, तर 71 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 639 वर आली आहे. कोरोनामुळं आत्तापर्यंत 5 लाख 21 हजार 530 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 97 हजार 567 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus New XE Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारताला किती धोका?; रवी गोडसेंची XEची बद्दल महत्वाची माहिती
- Corona XE Variant : मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरियंट; WHOकडून दिलासा देणारी माहिती
- Coronavirus : धोका वाढतोय? मुंबईत आढळले कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण
- बीएमसी म्हणतेय, मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळला, पण केंद्राचा नकार
- Coronavirus : धोका वाढतोय? मुंबईत आढळले कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण