(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 117 रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 117 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 131 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 921 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 117 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 131 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 94, 72, 239 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 911 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 921 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 282 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 142 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 रुग्ण
देशात आज कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1096 नवीन रुग्ण आढळले असून 81 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1260 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 13 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 345 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 93 हजार 773 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 28 हजार 131 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 रुग्ण, 81 जणांचा मृत्यू
Covaxin Vaccine: भारत बायोटेकने कोरोना लस 'कोवॅक्सिन'चे उत्पादन घटवले, जाणून घ्या कारण
Corona in China : चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच, शांघायमध्ये एका दिवसात 8226 रुग्णांची नोंद, जगाची चिंता वाढली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha