Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 2962 नव्या रुग्णांची नोंद तर 3918 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला आहे.
मुंबई : राज्यात आज 2962 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3918 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 7671 सक्रिय रुग्ण आहेत.
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,14,871 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.82 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 22,485 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 22,485 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7671 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यात 5063 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 16,103 नवीन कोरोनाबाधित
देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेत सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसंर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 11 हजार 711 सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 13 हजार 929 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 65 हजार 519 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या