Coronavirus: टेन्शन वाढलं! आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची लागण
Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेटपटू कोरोनाच्या जाळ्यात अडकत असल्याचं दिसून येत आहे.
Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेटपटू कोरोनाच्या जाळ्यात अडकत असल्याचं दिसून येत आहे. मागीत काही दिवसांत बऱ्याच खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. याचदरम्यान, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरला (Mitchell Santner) कोरोनाची लागण झालीय. याबाबत न्यूझीलंड क्रिकेटनं माहिती दिलीय. आयर्लंड दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का लागलाय. कोरोनाची लागण झाल्यामुळे न्यूझीलंडचा आयर्लंड दौरा लांबणीवर पडणार आहे.
एकदिवीसीय आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ आज आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होती. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंड संघ उशिरानं आयर्लंडला रवाना होणार असल्याची माहिती समोर आलीय. मिचेल सँटनरला नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टी-20 संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. सँटनरला कोरोनाची लागण झाल्यानंतर टॉम लॅथमला न्यूझीलंड संघाची कमान मिळू शकतं. लॅथम टी-20 संघात नसला तरी त्याला संधी दिली जाऊ शकते.
ट्वीट-
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ
टॉम लॅथम, (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेन क्लीव्हर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, विल यंग.
न्यूझीलंडचा टी-20 संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मि
हे देखील वाचा-
- IND vs ENG, Day 2 Highlights : भारताकडून दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी, दुसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, इंग्लंडची अवस्था 84/5
- IND vs ENG : बुमराहकडून चौकार-षटकारांचा पाऊस, ड्रेसिंग रुममध्ये कोच द्रविडपासून कोहलीपर्यंत सर्वांनीच केला तुफान जल्लोष, पाहा Video
- 44th Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचे मुंबईत स्वागत; पुढील टप्प्यासाठी गोवा सज्ज