Ajit Pawar corona : महाविकास आघाडी सरकार गॅसवर असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण
Ajit Pawar corona : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे. त्यानी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे.
Ajit Pawar corona : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे. त्यानी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
राज्यात राजकीय नेत्यांना कोरोना होण्याची मालिका सुरूच आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोना झाला होता. आता त्यामध्ये अजित पवार यांच्या नावाची भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच आपल्या कामकाजाला सुरुवात करताना बंडखोर आमदारांच्या कुटुबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अँटिजेन पॉझिटिव्ह आली होती त्यांनतर त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती.