एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिक, रविवारी 650 नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: 1 जानेवारीपासून आजपर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 70.97 टक्के रुग्ण हे साठ वर्षांवरील आहेत.

मुंबई :  सध्या देशभरात कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोनाचा धोका निर्माण झालाय. देशात सध्या सक्रिय रुग्णांची 57 हजारांच्या पुढे गेली आहे.  तर गेल्या 24 तासांत 23 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि कोरोना नियमांचं पालन होत असतानाही महाराष्ट्रासह केरळ, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे.  गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 93 रुग्ण सापडले. तर मुंबईत काल दिवसभरात 182 रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना आता खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे.

 राज्यात रविवारी कोरोनाच्या 650   रुग्णांची नोंद

 राज्यात रविवारी कोरोनाच्या 650   रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  ज्यात आज एकूण 779 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येमध्येही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात आज कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने सहा  हजारांचा टप्पा गाठला असून ती संख्या 6047  इतकी झाली आहे. 

महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिक

1 जानेवारीपासून आजपर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 70.97 टक्के रुग्ण हे साठ वर्षांवरील आहेत. तर 58 टक्के सहबाधित, 10 टक्के सहबाधित नसलेले रुग्ण आहेत. तर 320 टक्के रुग्णांची अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही 

राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के 

राज्यात आतापर्यंत 80, 01, 444 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्के इतकं झालं आहे. तर राज्यात आज कोरोनामुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. 

गरज असेल तिथे मास्क वापरा... 

सद्यस्थितीत आढळून येत असलेला व्हेरिएंट्स फारसा घातक नसून यात रुग्ण घरी उपचार घेऊन देखील बरा होत आहे. पेशंटला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू बेडची गरज पडत नाही. परंतु पेशंटला मात्र काही प्रमाणात त्रास होतो आणि म्हणून पेशंट असेल किंवा सीनियर सिटीजन असतील, यांना देखील विशेष काळजी घेण्याचा आवाहन सरकारने केलेले आहे. गरज असेल तिथे मास्कचा वापर करा, विशेष करून गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये, जिथे इन्फेक्शनचा धोका असतो, तिथे मास्क जर लावला पाहिजे असे देखील सूचना भारती पवार यांनी दिल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
Embed widget