Maharashtra Corona Update : सुखावणारी बातमी! दोन वर्षानंतर राज्यात बुधवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जवळपास दोन वर्षानंतर राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही . गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 544 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 007 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 38 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 38 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4771 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 102 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 13 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के आहे. सध्या राज्यात 45 हजार 422 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 660 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 80 लाख 3 हजार 848 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha