Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 807 नवीन कोरोनाबाधित
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे

मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 807 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 869 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 17 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 7 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 095 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 865 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 67 , 59, 668 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 256 रुग्णांची भर तर शून्य रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात मुंबईत 256 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाही रुग्णाला आपला जीव गमवावा लागला नाही. गेल्या 24 तासात 221 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 1808 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,44, 370 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2592 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
देशात 24 तासांत 7992 कोरोनाबाधितांची नोंद
देशात अजूनही कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. मागील 24 तासांत देशांमध्ये 7 हजार 992 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 393 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ओमायक्रॉय (Omicron) बाधितांची संख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 277 झाली आहे. त्याचबरोबर या महासाथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 75 हजार 128 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 9265 बरे झाले होते. आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 14 हजार 331 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Coronavirus Vaccination : नंदुरबारमध्ये प्रशासनाकडून रात्रीचा दिवस! दुर्गम भागात रात्रीच्या लसीकरणावर भर
- अंतराळातही भारतीय पदार्थांचा डंका, अंतराळावीरांची चमचमित भारतीय अन्नाला पसंती
- भाजपाला देशाचं ऐक्य नको हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजलं : संजय राऊत























