एक्स्प्लोर

Coronavirus Vaccination : नंदुरबारमध्ये प्रशासनाकडून रात्रीचा दिवस! दुर्गम भागात रात्रीच्या लसीकरणावर भर

Coronavirus Vaccination : नंदुरबारमध्ये कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Coronavirus Vaccination : कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी झाले होते. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाने रात्रीचा दिवस केला आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी लसीकरणावर भर दिला जात आहे. 

राज्यात सर्वात कमी लसीकरण नंदुरबार जिल्ह्यात झाले होते. लसीकरण कमी होण्यामागे काही कारणेदेखील होती. जिल्ह्याची भौगालिक परिस्थिती आणि दिवसा कामासाठी जाणारे मजूर यामुळे लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.  त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यावर उपाय शोधत रात्रीचे लसीकरण सुरु केले. सध्या याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील भौगालिक परिस्थिती तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने लसीकरणा संदर्भात असलेले समज आणि गैरसमज असल्याने  लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनाच्या समोर होते. यावर उपाय म्हणून 'हर घर दस्तक' मोहीम सुरु झाली. मात्र, रोजगारासाठी सकाळी मजूर घराबाहेर पडत असल्याने पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी लसीकरण सुरु करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात आशा ,अंगणवाडी सेविका आणि आरोग्य यंत्रणा रात्र आणि दिवस काम करत असल्याची माहिती समुदाय वैद्यकीय अधिकारी कीर्ती सूर्यवंशी यांनी दिली.

जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मजूर रोजगारासाठी बाहेर जात असतात व सायंकाळी परत येतात. याच काळात लसीकरणाचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. जिल्ह्यात दिवसा ७ ते ८ हजार डोस दिले जातात. तर, रात्रीच्या लसीकरण कॅम्पमध्ये दररोज १० ते १२ हजार डोस दिले जात आहेत. रात्रीच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही मोहीम रात्री अशीच चालू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे. 

रात्रीच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजगारासाठी अनेकजण दिवसा कामासाठी बाहेर जात असतात ते रात्री परत येत असल्याने रात्रीच्या लसीकरणाचा फायदा होत असल्याचे गावकरी सांगतात. मात्र, स्थलांतर झालेल्या नागरिकांचे जे जिथे गेले आहेत. त्या ठिकाणी लसीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली. नंदूरबार जिल्ह्यामधील लसीकरणाची टक्केवारी 67.18 टक्के इतकी आहे. जवळपास 9 लाख 54 हजार 141 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 5 लाख 13 हजार 106 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Solapur Crime News : राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
Embed widget