(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 2246 कोरोना रुग्णांची नोंद तर 1920 रुग्ण कोरोनामुक्त
Corona Update : राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 2246 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1920 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death)
राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,18, 535 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 11,690 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
राज्यात एकूण 11690 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5712 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1659 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत शुक्रवारी 1201 रुग्णांची नोंद, 681 कोरोनामुक्त ( Mumbai Corona Cases)
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. . मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 1201 रुग्णांची नोंद झाली असून 681 कोरोनामुक्त झाले आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 1,110, 298 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,670 झाली आहे. सध्या मुंबईत 5,712 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1201 रुग्णांमध्ये 1145 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 949 दिवसांवर गेला आहे.