Corona Cases Daily Update: दिवसभरात नव्या कोरोनाबाधितांमध्ये भीतीदायक वाढ; मृतांचा आकडाही वाढला
कोरोना विषाणू साऱ्या विश्वात थैमान घालत असतानाच महाराष्ट्रावरही कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे.
Corona Cases Daily Update कोरोना विषाणू साऱ्या विश्वात थैमान घालत असतानाच महाराष्ट्रावरही कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. ज्यामुळं नियंत्रणात येऊ पाहणारा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढू लादगला आहे. बुधवारी राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याचं पाहायला मिळालं.
राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे.
कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असतानाच बुधवारी तब्बल 2400727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच आजच्या दिवशी कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परिणामी आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे.
राज्यात सध्याच्या घडीला 3, 56, 243 इतके सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्याची ही स्थिती असतानाच राजधानी मुंबईतही कोरोनाची धास्ती कायम आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात 5 हजारहून जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळं मुंबईकरही कोरोनाच्या विळख्यात येत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
Maharashtra reports 39,544 new #COVID19 cases, 23,600 discharges and 227 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) March 31, 2021
Total cases 28,12,980
Total recoveries 24,00,727
Death toll 54,649
Active cases 3,56,243 pic.twitter.com/mCgf0QK8xT
Mumbai reports 5,394 new #COVID19 cases, 3,130 recoveries and 15 deaths today.
— ANI (@ANI) March 31, 2021
Total cases: 4,14,714
Total recoveries: 3,50,660
Active cases: 51,411
Total deaths: 11,686 pic.twitter.com/1B0bnx0emO
नियमांमध्ये आलेल्या शिथिलेचा गैरफायदा घेत नागरिकांच्या बेजबबादारपणामुळं कोरोना अधिक वेगानं फैलावला ही वस्तुस्थिती. येत्या काळात हे चित्र असंच राहिल्यास कठोरातील कठोर निर्बंधांचं रुपांतर लॉकडाऊनमध्ये झाल्यास आश्चर्य वाटू नये.
लॉकडाऊन होणार का?
राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होणार का? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाऊनबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत चर्चा सुरू असते. कडक निर्बंधांबाबत शासन पाऊल उचलेल. लोकांनी गर्दी टाळावी हा दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये कडक निर्बंध आणत आहोत, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.