Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,595 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3, 240 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 342 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3,595 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 20 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के आहे.
राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 342 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,65,29,882 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,11,525 (11.52 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,89,425 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,908 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4654 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1279 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 39 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शून्य आहेत.
देशात 4 दिवसांनी कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल. गुरुवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाबाधितांची गेल्या दहा दिवसांतील आकडा :
10 सप्टेंबर : 33,376
11 सप्टेंबर : 28,591
12 सप्टेंबर : 27,254
13 सप्टेंबर : 25,404
14 सप्टेंबर : 27,176
15 सप्टेंबर : 30,570