एक्स्प्लोर

Exclusive : साहेब, 'दरेकर, लाड, महाजनांना गाडीत टाका आणि शिवबंधन बांधा', मिलिंद नार्वेकरांचा इरादा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहाययक मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar) यांनी चक्क विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप नेते प्रसाद लाड(Prasad Lad) यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्याची इच्छा व्यक्त केली. 

मुंबई : शिवसेना-भाजप...गेली अनेक वर्षे एकमेकांसोबत असलेले हे मित्रपक्ष...सध्या जरी हे दोन्ही पक्ष एकत्र नसले तरी हे दोन्ही पक्ष कधीही एकत्र येतील अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यातच आज विधानभवन परिसरात एक किस्सा घडला.  एकमेकांवर आरोप करणारे आज एकमेकांसोबत हसताना दिसले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी होते. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाययक मिलिंद नार्वेकर यांनी तर चक्क विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्याची इच्छा व्यक्त केली. 

असा घडला किस्सा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातील बैठक संपवून गाडीतून जात असताना अचानक विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आणि गिरीष महाजन तिथे आले यावेळी मिलिंद नार्वेकर आणि या तिन्ही नेत्यांमध्ये गंमतीदार संवाद झाला. मिलिंद नार्वेकर यावेळी म्हणाले उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याचवेळी प्रविण दरेकर म्हणाले. आम्ही केव्हाही येऊ शकतो. दरेकरांचे हे वाक्य ऐकताच  मिलिंद नार्वेकर म्हणाले यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बाधूया  हे ऐकून दरेकर म्हणाले आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचे मूळ आहे. हे ऐकून सर्वांचा हशा पिकला. 

प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बने युतीचे संकेत? 

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्यातील राजकारणात चर्चा घडवून आणली होती. त्यांनी तर आपल्या पत्रात युतीशी जुळवून घ्यायला हवे असे म्हटले होते. यावेळी लिहिलेल्या पत्रात प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे असे सरनाईक आपल्या पत्रात म्हणाले. त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी भी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत" अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी "महाविकास आघाडी" स्थापन केली की काय ? अशी चर्चा असल्याचे देखील सरनाईक म्हणाले होते.

बावनकुळेचेही संकेत 

प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे 90  टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करत आहेत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको असे आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget