Ambadas Danve: घरकुल योजनेतील घोटाळ्याप्रकरणी दानवेंचा आक्रमक पवित्रा; एसआयटी चौकशीची केली मागणी
Ambadas Danve : घरकुल योजनेतील घोटाळ्याला प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) वतीने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 40 हजार घरे बांधण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियात (Tender Process) घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलीस, ईडी आणि महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान आता याच घरकुल योजनेतील घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या सर्व प्रकरणाची आणि घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांची एसआयटी चौकशी केली जाणार का? असा सवाल दानवे यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, संभाजी नगरमध्ये सुरू असलेली घरकुल योजनेत 7 हजार घरांची परवानगी दिली असताना प्रत्यक्षात तेथे 40 हजार घरकुलाची वर्क ऑर्डर देण्यात आली. याबाबत आता ईडीकडून चौकशी करण्यात येत असून ही योजना परत गेल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न केला. तसेच याला जबाबदार असणाऱ्या सर्वांची एसआयटी चौकशी करणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल असताना सरकार याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगर शहरातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत झालेल्या तथाकथित घोटाळ्याचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.
उद्दिष्ट कशाप्रकारे पूर्ण करणार
दरम्यान पुढे बोलताना दानवे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महाराष्ट्राला 1 लाख 955 घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही घरं अन्य राज्यात पाठवल्याची माहिती असून, ही माहिती खरी असेल तर राज्य सरकार काय पाऊल उचलणार, आणि खोटी असेल तर उद्दिष्ट कशाप्रकारे पूर्ण करणार असा सवाल अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.
सार्वजनिक प्रकल्प गायरानावर करता येऊ शकतो.
तर गायरानावर घरकुल बांधता येत नाही असे म्हणणे योग्य नाही. घरकुल हा सार्वजनिक प्रकल्प आहे, घरकुल हा व्यक्तिगत विषय नाही. सार्वजनिक प्रकल्प गायरानावर करता येऊ शकतो. यावर शासन काय पावलं उचलणार असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. रमाई व शबरी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात दोन वर्षात एकाही घरकुलाला मंजुरी मिळाली नसल्याचे दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhaji Nagar: पंतप्रधान आवास योजना घोटाळा; छ. संभाजीनगर महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस