एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: पंतप्रधान आवास योजना घोटाळा; छ. संभाजीनगर महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस

Chhatrapati Sambhaji Nagar News : यामध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता आदींचा समावेश आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) वतीने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 40 हजार घरे बांधण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियात (Tender Process) अनियमितता झाल्याने ती निविदा रद्द करण्यात आली. या प्रकरणात शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ED)  छापेमारी करत या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे.  असे असताना आता या प्रकरणात महापालिका आयुक्तांनीही निविदा समितीत सहभागी सहा अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा मागवला आहे. यामध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता आदींचा समावेश आहे.

महापालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्याच्या चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र या निविदा प्रक्रियेत ठेकेदार कंपनीने रिंग करून महापालिकेची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यावरून महापालिकेने निविदा प्रक्रियेतील विविध कंपन्यांच्या 19 संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. त्यातच गेल्या आठवड्यात या प्रकरणी ईडीने देखिली छापेमारी करत चौकशी सुरु केली आहे. तर आता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत चौधरी यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

या अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत...

बीबी नेमाने : महापालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेची निविदा प्रक्रिया सुरू असतानाम, बीबी नेमाने अतिरिक्त आयुक्त होते. तर निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली आहे का? याची माहिती घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे.

सखाराम पानझडे : मनपा आयुक्त यांनी नोटीस दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सखाराम पानझडे यांचा समावेश आहे. तर पानझडे सध्या महापालिकेतून निवृत्त आहे. तर पंतप्रधान आवास योजनेची निविदा प्रक्रिया झाली त्यावेळी शहर अभियंता होते. तसेच निविदा प्रक्रिया कशी असावी? हे ठरवण्यासाठी जी समिती नेमली होते त्यामधील पानझडे सदस्य होते.

अपर्णा थेटे : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या अपर्णा थेटे प्रमुख आहे. सध्या त्या महापालिकेत उपायुक्त आहेत. तर निविदा प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी थेटे यांच्यावर होती. विशेष म्हणजे सोमवारी त्यांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ए.बी.देशमुख : पंतप्रधान आवास योजनेची निविदा ज्यावेळी झाली, त्यावेळी ए.बी.देशमुख नगर रचना विभागाचे उपसंचालक होते. सद्या ते महापालिकेत शहर अभियंता आहेत. तसेच निविदेच्या अटी शर्ती ठरवणं, निविदा कशी असावी, काय असावं यासाठी जी समिती नेमली गेली, त्या समितीचे ए. बी. देशमुख सदस्य आहेत. 

संतोष वाहुळे : पंतप्रधान आवास योजना निविदा समितीचे संतोष वाहुळे सदस्य आहेत. सध्या महानगरपालिकेमध्ये मुख्य लेखाधिकारी आहेत. त्यांना देखील आयुक्त यांनी नोटीस पाठवली आहे. 

ईडीने ताब्यात घेतलेली कागदपत्रे...

  • निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्र
  • एजन्सीने दाखल केलेली कागदपत्रे
  • पंतप्रधान आवास योजनेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना
  • पंतप्रधान आवास योजनेसाठी तयार करण्यात आलेला डी.पीआर 
  • सार्वजनिक बांधकाम विभागाचा जीआर 
  • शासनाच्या चौकशी समितीचा अहवाल 
  • वारंवार झालेल्या बैठकीचे इतिवृत्त 
  • आवास योजनेसाठी महसूल विभागाने पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या जागांची माहिती

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर शहरात 'ईडी'कडून छापेमारी; नऊ ठिकाणी कारवाई सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget