Maharashtra Cabinet Expansion : संभाव्य खातेवाटपाची यादी, पाहा कुणाकडे जाऊ शकते कोणतं मंत्रीपद?
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
Maharashtra Cabinet Expansion : 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (9 ऑगस्ट) पार पडला. सकाळी 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुणाला कोणतं खातं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार मंत्रिपदाची यादी फायनल झाली आहे. सर्वात महत्वाची दोन खाती गृह आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे तर नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. ही असतील संभाव्य खाती...
1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)
2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ
3) राधाकृष्ण विखे पाटील - महसुल, सहकार
4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन
5) चंद्रकांतदादा पाटील - सार्वजनिक बांधकाम
6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास
7) गिरीश महाजन - जलसंपदा
8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
9) दादा भुसे- कृषी
10) संजय राठोड- ग्राम विकास
11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय
12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी
13) उदय सामंत - उद्योग
14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री
15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण
16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास
17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण
18) अतुल सावे - आरोग्य
19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क
20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय
मिनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक दिग्गजांना संधी मिळाली नाही. बच्चू कडू यांनी पुढील मंत्रीमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावेळी उर्वरित आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचंचं पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुढचा नंबर नेमका कोणाचा?
भाजपकडील आमदार
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
संभाजी पाटील निलंगेकर
संजय कुटे
प्रसाद लाड
जयकुमार रावल
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
माधुरी मिसाळ
जयकुमार गोरे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर
बंटी बांगडिया
एकनाथ शिंदे गट
बच्चू कडू
संजय शिरसाट
भरत गोगावले
राजेंद्र यड्रावकर
प्रकाश अबिटकर
सदा सरवणकर
प्रकाश सुर्वे