एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : अखेर 40 दिवसांनी 20 कारभारी मिळाले! मंत्रिमंडळाची खास वैशिष्ट्ये

Maharashtra Cabinet Expansion : अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet Expansion) 40 दिवसांनी मुहुर्त मिळाला. एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Maharashtra Cabinet Expansion : राज्याच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज 40 व्या दिवशी विस्तार झाला आहे. 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.  

भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले. या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.

शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाची 10 वैशिष्ट्ये

1-पहिल्या विस्तारात फडणवीस आणि शिंदे गटाच्या 9-9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ

2- मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही

3- शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट यांचा पत्ता कट

4) मागे पडलेलं अब्दुल सत्तारांचं नाव ऐनवेळी आघाडीवर 

5) भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोडांना पुन्हा मंत्रिपदाचा मान

6)  तानाजी सावंत, दीपक केसरकर या सेनेच्या माजी मंत्र्यांना शिंदे मंत्रिमंडळात पुन्हा स्थान

7) शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या विद्यमान मंत्र्यांना पुन्हा स्थान

8) भाजपच्या मंत्रिपदाच्या चेहऱ्यावर देवेंद्र फडणवीसांची छाप

9) काँग्रसमधून भाजपात आलेल्या राधाकृष्ण विखेंना मानाचं स्थान

10) भाजपकडून औरंगाबादचे आमदार अतुल सावे हा नवा चेहरा मंत्रिमंडळात

शिंदे गटातील मंत्री 

  1. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
  2. उदय सामंत (Uday Samant)
  3. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)
  4. दादा भुसे (Dada Bhuse)
  5. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
  6. दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
  7. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
  8. संजय राठोड (Sanjay Rathod)
  9. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

भाजपकडून मंत्री

  1. गिरीश महाजन (Girish Mahajan)
  2. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
  3. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
  4. सुरेश खाडे (Suresh Khade)
  5. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
  6. अतुल सावे (Atul Save)
  7. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
  8. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
  9. मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget