एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion Live : मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला, सर्व 18 मंत्र्यांनी घेतली शपथ, सर्व मंत्री कॅबिनेट दर्जाचे

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आज पार पडत आहे. यात शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 आमदार शपथ घेतील.यासंबंधीचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Cabinet Expansion Live : मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला, सर्व 18 मंत्र्यांनी घेतली शपथ, सर्व मंत्री कॅबिनेट दर्जाचे

Background

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार असून सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे (Eknath Shinde) गटाचे सात मंत्री तर भाजपकडून (BJP) 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात काही तास चर्चा झाली. शिंदे गटामध्ये मंत्रीपदासाठी जोरदार चुरस असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाकडे आहे. यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांचे नाव असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून हे मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपच्या मंत्र्यांची यादी ठरली असून टप्प्याटप्प्याने त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. 

शिंदे गटाकडून हे मंत्री शपथ घेतील
1) उदय सामंत (Uday Sawant)
2) दादा भुसे (Dada Bhuse) 
3) संजय शिरसाट (Sanjay Sirsat)
4) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
5) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
6) भरत गोगावले (Bharat Gogawale)
7) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

भाजपकडून हे मंत्री शपथ घेतील

1) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
3) सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)
4) गिरिष महाजन (Girish Mahajan)
5) सुरेश खाडे (Suresh Khade)
6) अतुल सावे (Atul Save)
7) मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
8) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
9) विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे गटाचं ठरलं; उदय सामंत, दादा भूसे, गुलाबराव पाटील यांच्यासह हे सात मंत्री शपथ घेणार, सत्तारांचा पत्ता कट?

Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं! तारीख अन् वेळ निश्चित, राजभवनावर शपथविधी


Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; प्रमाणपत्र रद्द, सत्तार म्हणाले..

 

13:35 PM (IST)  •  09 Aug 2022

BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता ; सूत्रांची माहिती

BJP : मुख्यमंत्री मराठा, उपमुख्यमंत्री ब्राह्मण, त्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

13:31 PM (IST)  •  09 Aug 2022

Maharashtra Cabinet Expansion : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल; संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा

Maharashtra Cabinet Expansion : दारव्हा-दिग्रच मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जनसंपर्क कार्यालयात एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्या सारमर्थनार्थ घोषणा बाजी केली. जनसंपर्क कार्यालय आणि घरासमोर फटाके फोडून आनंद साजरा करून बॅण्डच्या तालावर कार्यकर्यांनी ठेकाही धरला. संजय राठोड यांना एका प्रकरणांमध्ये आपलं वन मंत्रिपद गमावावं लागल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. यवतमाळ जिल्ह्यात एकही मंत्रीपद नसल्यानं पालकमंत्री पद हे माजी मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे होते. तर आता पुन्हा आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानं जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी त्यांची निश्चितच वर्णी लागल्यास जिल्ह्याचा विकास होईल. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांची कामं तातडीनं होईल, शिंदे सरकारमध्ये वंचित घटकाला आता न्याय मिळेल. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला विकास आता पूर्ण क्षमतेनं आणि जलद गतीनं होणार असल्याचाही विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 
 
13:29 PM (IST)  •  09 Aug 2022

Maharashtra Cabinet Expansion : राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेताच अहमदनगरला फटाकडे फोडून जल्लोष

Maharashtra Cabinet Expansion : राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेताच अहमदनगरला फटाकडे फोडून जल्लोष साजरा

खासदार सुजय विखे यांच्या संपर्क कार्यालया समोर एकमेकांना पेढे भरवत केला जल्लोष, तर आनंद साजरा करत जोरदार घोषणाबाजी 

13:28 PM (IST)  •  09 Aug 2022

शिंदे समर्थकांचा जल्लोष, दिपक केसरकर आणि उदय सामंत यांची शपथविधी झाल्यानंतर सिंधुदुर्गात जल्लोष

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन सुपुत्रांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडीत शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून उदय सामंत आणि दिपक केसरकर यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आनंद साजरा केला. जिल्ह्याच्या विकासात दोन्ही सुपुत्राच्या हातभार लागून जिल्हा विकसनशील होण्यासाठी मदत होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी केली आहे. 

13:26 PM (IST)  •  09 Aug 2022

Maharashtra Cabinet Expansion : भर पावसात सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Maharashtra Cabinet Expansion : सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी भर पावसात जोरदार जल्लोष केला. भरपावसात भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत आनंद व्यक्त केला. पालकमंत्री म्हणून मागील युती सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा कार्यकर्त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. गेले अडीच वर्ष चंद्रपूर जिल्ह्याची विकास प्रक्रिया खंडित झाली असल्याचे कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले. आता पुन्हा मूलभूत विकासासह जिल्ह्यात रखडलेले मोठे विकास प्रकल्प वेगाने पूर्ण होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. चंद्रपूर शहरातील पाच प्रमुख मंडळांमध्ये भाजपच्या वतीने जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. चंद्रपूर जिल्ह्याला विकासप्रक्रियेत वेगाने पुढे नेण्यासाठी मुनगंटीवार यांचा समावेश लाभदायक होणार असल्याची भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget