'प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल'; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका
Maharashtra Budget Session LIVE: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाना पटोलेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Maharashtra Budget Session : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांच्या विरोधातील हा सूर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही दिसून आला. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा राज्यपालांवर टीका केली आहे (Nana Patole On Governor Bhagat Singh Koshyari) आज 'प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात 'भाजपाल'', असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हर राज्य में राज्यपाल होता है, महाराष्ट्र में 'भाजपाल' है|
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2022
कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले काल म्हणाले होते की, राज्यपाल कोश्यारी यांनी आधी शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आता महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांना आता माघारी जावं लागेल. आम्ही त्याबाबत कायदेशीर तपासणी करत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष राज्यपालांना आवडत नाही त्यामुळे ते सभागृहातून निघून गेले, असं नाना पटोले म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असे नाना पटोले यांनी काल सांगितले.
कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही
पटोले म्हणाले की, विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भारतीय जनता पक्षाला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असं देखील पटोले म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Budget Session LIVE: अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले