Maharashtra Breaking Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!
Maharashtra Breaking Updates: छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
LIVE

Background
Maharashtra Breaking Updates: छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरीसह तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्याचा समावेश यामध्ये समावेश आहे. तसेच सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाटांचा पैशांच्या बॅगेसह व्हिडीओ समोर आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बॅगेट नोटांची बंडलं असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. तसेच आणखी नवे व्हिडीओ बाहेर काढणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
डोंबिवली मिलाप नगर परिसरात महानगर गॅस पुरवठा बंद
डोंबिवली मिलाप नगर परिसरात महानगर गॅस पुरवठा बंद. दुपारी चार वाजता अचानक महानगर गॅस पुरवठा बंद. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर मधील ओमकार टावर जवळ महानगर गॅस कडून मेंटनस चे काम सुरू असल्याने परिसरातील गॅस लाईन बंद. दोन तासांपासून गॅस पुरवठा बंद . मागील तीन महिन्यात गॅस पुरवठा बंद होण्याच्ची चौथी घटना
पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका.
देशात प्रसिद्ध असलेल्या खिरेश्वर(ता.जुन्नर) हद्दीतील काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला वाचविण्यात यश आले. सदर घटना शुक्रवारी (ता.११)दुपारी तीनच्या दरम्यान घडली. काळू धबधबा हा पाच टप्यांत खोल दरीत कोसळत असतो.त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी एक पर्यटक हा पाय घसरून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. खाली शेकडो फुट खोल दरी व काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला असता.तेथे असलेल्या पर्यटकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.वाचवणाऱ्या युवकांनी स्कार्फ, ओढणीच्या माध्यमातून दोरी तयार केली होती. जर या पर्यटकाला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसते तर त्याचा खोल दरीत पडून मृत्यू झाला असता. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय याठिकाणी आला.सदर व्यक्ती हा पुणे येथून हैद्राबादच्या पर्यटकांना घेऊन आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.























