Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढत चालला आहे. विविध ठिकाणी पारा घसरला असल्याचं समजत आहे. तर दुसरीकडे बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कराड यांच्या अटकेनंतर देशमुख हत्याप्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत 2 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा, निष्ठावान लोकांना संधी द्याव्यात, कार्यकर्त्यांची मागणी
NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत 2 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर
आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा, त्यांना विविध संधी द्याव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी
Bjp: भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार, मार्च महिन्याचा मुहूर्त
Bjp: भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार
बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख निवडीनंतर होणार प्रदेश अध्यक्ष निवड
जानेवारीत सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्ष निवड होणार
भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त
Walmik Karad: वाल्मीक कराड यांची तिसऱ्या दिवशी सीआयडी चौकशी सुरू
Walmik Karad: वाल्मीक कराड यांची तिसऱ्या दिवशी सीआयडी चौकशी सुरू..
एकीकडे केज शहरात सीआयडी कडून चौकशी सुरू असतानाच
बीड शहरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मीक कराड ची तिसऱ्या दिवशी सीआयडीने चौकशी चालू ठेवली आहे..
Pune: पुण्यात टू व्हीलर विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देण्यासाची सक्ती, दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य
Pune: पुण्यात टू व्हीलर विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देण्यासाची सक्ती
नवीन दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य
पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व शोरूम मालकांना आदेश
रस्त्यावरील होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय
दोन हेल्मेट देणे असणार बंधनकारक
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार दोन जिल्ह्यांच पालकमंत्री पद घेण्याची शक्यता
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार दोन जिल्ह्यांच पालकमंत्री पद घेण्याची शक्यता
अजित पवार पुण्यासह आणखी एका जिल्ह्याच पालकमंत्री पद घेऊ शकतात
दुसरा जिल्हा बीड असू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा
महायुतीत पुणे आणि बीडपालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे
अजित पवार मुंबईत दाखल झाल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर पक्षाची पालकमंत्री पदाची यादी महायुतीच्या समनव्यांकडे दिली जाईल