(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News Live Updates : सत्तास्थापनेनंतर महायुती पहिला निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत घेणार?
Maharashtra Election Results News Live Updates: आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024 Result) महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळालं आहे. मतदारांनी महायुतीच्या पदरात मतांचं भरभरून दान दिलंय. अनेक जिल्ह्यात महाविकास आघाडीची दाणादाण उडाली आहे. दरम्यान, आता निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा निवडण्यासाठी महायुतीमध्ये सध्या चर्चा होत आहे. शिवेसना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे आम्ही सर्वांत मोठा पक्ष असल्यामुळे आम्हालाच मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नेमका कधी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सत्तास्थापनेनंतर महायुती पहिला निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत घेणार?
सत्तास्थापनेनंतर महायुती पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार?
विधानसभा निवडणूकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेची दरमहा रक्कम लवकरच २१०० केली जाणार?
सत्तास्थापनेनंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० वरुन २१०० करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता
ज्या योजनेनं महायुतीला यश दिलं त्या योजनेबाबत दिलेलं आश्वासन महायुती लवकरच पूर्ण करणार
मला पण वाटतं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा - अंबादास दानवे
रावसाहेब दानवे
भाजप आज नाही अनेक दिवसांपासून मित्र पक्ष असल्यापासून निवडणुका लढवत आहे
ज्यांच्यासोबत लढलो त्यांच्या सोबत बसून निर्णय करावे लागतात
एकत्रित निवडणूक लढलो
विधीमंडळ पक्षाची नेते निवड होईल, भाजप देखील लवकर निवड करेल
आणि त्यानंतर मित्र पक्षांसोबत बैठक होईल आणि नंतर मुख्यमंत्र्यांची निवड होईल
फडणवीस मुख्यमंत्री होणं हे कार्यकर्त्यांना वाटू शकतं
मला पण वाटतं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा
ज्यांच्या सोबत लढलो त्यांना विचारुन सोबत घेऊन निर्णय होईल
मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात
मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात
उद्धव ठाकरे बैठकीमध्ये सर्व नवनिर्वाचित आमदारांसोबत चर्चा आणि मार्गदर्शन करणार
महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले सर्व 20 आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत
वीस आमदारांसोबत काही महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे
आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
सूत्रांची माहिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही, काँग्रेसची माहिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही
या संदर्भातील बातम्या असत्य असून खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत