Maharashtra Breaking News LIVE: मोठी बातमी.. महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
LIVE

Background
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यात संतप्त पडसाद; लातूर-बार्शीत चक्का जाम
लातूर: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळावीर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे लातूर-परभणी रोडवरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे रेणापूर येथे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याठिकाणी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सध्या रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अद्याप मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता;सरपंच परिषदेची मागणी
Santosh Deshmukh Case : मस्साजोग प्रकरणाचे पडसाद राज्याच्या कानाकोपर्यात उमटत असताना या घटनेमुळे सर्व सरपंचांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. हे जर असचं सुरू राहिलं तर दोन जातींमध्ये तेढ निर्माण होण्यासही वेळ लागणार नाही. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा आतापर्यंत स्व: इच्छेने द्यायला हवा होता. अजित दादा हे का तो ठेवून घेतलाय माहित नाही. अशी प्रतिक्रिया सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.

सिंदखेड राजा येथे सापडलेली 12व्या शतकातील शेषशाही भगवान विष्णूंची मूर्ती धुळखात
सिंदखेड राजा : राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखोजी जाधव यांच्या सिंदखेड राजा येथील समाधी परिसरात सात ते आठ महिन्यापूर्वी उत्खनन करत असताना अमूल्य व अप्रतिम अशी रेखीव आणि बाराव्या शतकातील शेषशाही भगवान विष्णूंची मूर्ती सापडली होती. पुरातत्त्व विभागाने ही मूर्ती बाहेर काढली असून याच परिसरात ही मूर्ती धुळखात पडून आहे. मात्र येत्या 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव असल्याने जगभरातून जिजाऊ भक्त सिंदखेड राजा येथे येतात. त्यामुळे ही मूर्ती जिजाऊ भक्त आणि पर्यटकांना दर्शनासाठी खुली करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुरातत्त्व विभागाने हे मूर्ती बाहेर काढली. मात्र त्याच परिसरात ही मूर्ती पडून असल्याने अशी अप्रतिम मूर्ती पर्यटकांना बघता येत नाही आणि त्यामुळे आता जिजाऊ भक्तांनी ही मूर्ती खुली करण्याची मागणी केली आहे

महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज