Maharashtra Breaking News LIVE Updates : पालघर : तारापूर MIDC तील तारापूर फार्मा कंपनीला भीषण आग
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Omicron Update : ओमायक्रॉनचं टेन्शन, पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक; देशात पुन्हा निर्बंध?
Covid-19 New Variant : देशात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भर पडत आहे. देशात हा नवा व्हेरियंट वेगानं आपले हातपाय पसरताना दिसत आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येनं धाकधुक वाढवली आहे. देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक पार पडणार आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मोदी काय निर्णय घेणार? पुन्हा निर्बंध लादणार का? याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जिनोम सिक्वेंसिंगमार्फत आतापर्यंत देशात ओमायक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वाधिक 57 ओमायक्रॉनबाधित आहेत. तर महाराष्ट्रात 54, तेलंगणात 24, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18, केरळात 15 आणि गुजरातमध्ये 14 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 15 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.
ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
New Delhi Covid Omicron guidelines : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढत चालल्यानं केंद्रासह राज्य सरकारंही पावलं उचलताना दिसत आहे. मुंबईनंतर आता देशाची राजधानी दिल्लीतही नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश काल जारी केला आहे. दिल्लीत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे. यात आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे.
दिल्लीमध्ये काय असणार निर्बंध
ख्रिसमस सणानिमित्त प्रमाणात सेलिब्रेशन होतं. त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह असतो. 31 डिसेंबरच्या रात्री इंडियागेटसह दिल्लीतील अनेक ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. या सर्व बाबी लक्षात घेत संसर्गाचा फैलाव रोखण्यासठी दिल्ली सरकारने पावलं उचलली आहेत. डीडीएमएच्या आदेशानुसार दिल्लीत सर्व सामाजिक, राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
अंबरनाथ शहरातील जुन्या डम्पिंग ग्राऊंडला लागली आग
अंबरनाथ शहरातील जुन्या डम्पिंग ग्राऊंडला लागली आग
मोरीवली पाड्याजवळील डम्पिंगला मोठी आग
सध्या हे डम्पिंग बंद आहे, मात्र तरीही आग लागल्यानं आग लावली गेल्याचा संशय
आगीमुळे डम्पिंग परिसरातून धुराचे मोठे लोट
अद्याप अग्निशमन दल घटनास्थळी दाखल नाही
सोलापुरात ड्रेनेजमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू, दोघे जखमी
मुंबई लोहमार्ग पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 पुढील सूचना येईपर्यंत बंद
काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई लोहमार्ग पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत 022-23759201 किंवा 9594899991 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पालघर : तारापूर MIDC तील तारापूर फार्मा कंपनीला भीषण आग
पालघर : तारापूर MIDC तील तारापूर फार्मा कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे
नागपुरात ओमायक्रोन व्हेरीयंटचा आणखी एका बाधित रुग्णाची नोंद
नागपुरात ओमायक्रोन व्हेरीयंटचा आणखी एक बाधित रुग्ण आढळला आहे. 18 डिसेंबर रोजी दुबईवरून आलेला 21 वर्षांचा तरुण कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटने बाधित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. हा तरुणाचे लसीकरण पूर्ण झाले असून सध्या त्याला कुठल्याही तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत. त्याला नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.