Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

Background
Maharashtra Breaking News Live Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील शुभ- दीप निवासस्थानाला रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेवर देखील भाष्य केलं आहे. निकषांत न बसणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई केली जाईल. अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेत कोणतेही नवे निकष नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स
दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर; पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैर कारभार
धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैर कारभार...
दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर..
पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक घटना......
कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रताप......
आधार कार्ड ,कोर्टाच्या नोटिसा ,बँक चेक यासह इतर महत्त्वाचे कागदपत्रे फेकले उघड्यावर....
पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा आला समोर.....
वाटप होत नसल्याने महत्वाचे कागदपत्रे पोस्ट ऑफिस मध्ये पडून....
गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिस मध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती.....
एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असतं मात्र पोस्टमार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींच्या अडचणी वाढणार?
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी उच्च न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्याने स्वामी यांच्या विरोधात एकतर्फा निकालासाठी ज्ञानराज चौगुले यांचा अर्ज दाखल
माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांनी निवडणूक आयोगाच्या अटी, शर्थी नुसार निवडणूक लढवली नसल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात याचिका
सुनावणीअंती विद्यमान आमदार प्रवीण स्वामी हे नोटीस प्राप्त झाल्यापासून उच्च न्यायालयात गैरहजर
आमदार प्रवीण स्वामी यांनी स्वतःच्या बाजूने वकिल न दिल्याने माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यामार्फत एकतर्फा आदेश पारित होण्यासाठी दाखल करण्यात आला अर्ज
दरम्यान, जनतेच्या दरबारात लढाई हरल्याने विरोधक हतबल झाल्याची स्वामी यांची टीका
जात वैधता प्रमाणपत्र अकरा वर्षापूर्वी प्राप्त झाल्याचा स्वामी यांचा दावा, सर्व नियम अटींची पूर्तता केल्याच मत
जनतेच्या दरबारात लढाई जिंकून दाखवावी असं आव्हान
सदर प्रकरणाच्या आदेशासाठी उच्च न्यायालयात 18 फेब्रुवारीला पुन्हा सुनावनी























