Maharashtra News Live Updates : संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर- सदाभाऊ खोत
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यातील बडे नेते एका-एका दिवशी तीन ते चार सभा घेत आहेत. या सभांमधून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्हीच निवडणूक जिंकणार, असा दावा प्रत्येकजण करत आहे. या निवडणुकीत अनेक छोट्या पक्षांकडूनही पूर्ण ताकद लावली जात आहे. त्यामुळे भविष्यात ही निवडणूक कोण जिंकणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर- सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहे , डुकराला कितीही साबण लावला तरी ते घाणीत जात असतं
संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतं, ते धन्याची राखण आणि संरक्षण करतं
संजय राऊत यांनी 2014 ला कुणाचा फोटो गळ्यात घालून फोटो घालून मते मागितली हे पाहावे
काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीला सुरवात, चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समिती गठीत
काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीला सुरवात
चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समिती गठीत करण्यात आली आहे
या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती ठरवली जाणार























