Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: अशोक मोहिते मारहाण प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्यात विविध घडामोडी देखील घडत आहे.

Background
Maharashtra Breaking News Live Updates: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे नागपूरकरांना आजपासून (7 फेब्रुवारी) पाहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन होणार असून त्यामध्ये ऐतिहासिक वाघनखेही लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार आहे. तसेच अशोक मोहिते मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्यात विविध राजकीय घडामोडी देखील घडत आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन देखील महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
आज जो स्वातंत्र्य आपण उपभोगतोय त्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली : देवेंद्र फडणवीस
-छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा रक्षण करण्याकरिता ज्या वाघनखांचा वापर केला होता, ती वाघनखे महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे ती भारतात आणली गेली. साताऱ्यात लाखो लोकांनी ती वाघनखं पाहिली.
- छत्रपतींच्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी हिमतीने, कल्पकतेने छत्रपतींनी त्याच्यातून मार्ग काढला.
-अफजलखानाशी भेटीची तारीख निश्चित झाल्यानंतर आई जिजाऊसह अनेकांच्या मनात शंका होती.
- अनेकांनी भेटीला जाण्यास मनाई केली, तरी स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती गेले.
-अफजलखाने छत्रपतींना मारण्याचा प्रयत्न केला असला तरी वाघनखांचा वापर करून छत्रपतींनी अफजलखानाला धाराशाही केले.
-पारतंत्र्याचा अंधकार असताना मा जिजाऊ शिवरायांना देश, देव आणि धर्माची लढाई लढण्यास सांगितले.. वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपतींनी तो लढा सुरू केला.
-आज जो स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहे त्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली आहे... राजा, शासक आणि शासनाने कसा कारभार केला पाहिजे याचा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांनी दिला. पाण्याचे नियोजन, पर्यावरण रक्षण, महिलांचे रक्षण, कायदा सुव्यवस्था कशी राखावी हे सर्व छत्रपतींनी शिकवले... म्हणून ते आपले आराध्य दैवत आहे.
-ही वाघनखं स्वराज्याची शस्त्रे आहेत.
खळबळजनक! पुण्यात पुन्हा पोलिसावर हल्ला; चक्क डोक्यात दगड घातला
पुणे: फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. राजेश गणपत नाईक (वय ४७) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला. राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले होते. याचा राग आल्याने त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू आहेत. तर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत..























