Maharashtra News Live Updates : पुण्यात 16 वर्षीय मुलीवर 4 तरुणांकडून अत्याचार, अभाविपचे महाविद्यालयासमोर आंदोलन
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आता कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. तर दुसरीकडे तिकीट मिळावे म्हणून राज्यभरातील नेतेमंडळी पक्षनेतृत्त्वाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यत सध्या सगळीकडे परतीचा पाऊस कोसळतोय. या पावसामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कापूस या पिकाचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. पुणे, मुंबईतही पाऊस बरसत आहे. या प्रमुख घडामोडींसह देश, राज्य तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांकडून बदलापूर, अंबरनाथ, ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये चाचपणी
अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर अंबरनाथ आणि ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये चाचपणी सुरू
पोलिस प्रशासनाकडून स्मशानभूमित जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा
जागा उपलब्ध होताच आज किंवा उद्या सकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती
अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्यसरकारने गुरूवारी उच्चन्यायालयात हमी दिली होती
पुण्यात 16 वर्षीय मुलीवर 4 तरुणांकडून अत्याचार, अभाविपचे महाविद्यालयासमोर आंदोलन
पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील १६ वर्षीय मुलीवर ४ तरुणांकडून अत्याचार झाल्याची घटना घडली. त्याविरोधात पुण्यातील ABVP च्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत महाविद्यालयासमोर आंदोलन केलं. हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न कॉलेज प्रशासन करत आहे. याची चौकशी व्हावी आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी abvpच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.























