Maharashtra breaking News Live Updates : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 45 जागांची यादी जाहीर, युगेंद्र पवार बारामतीतून लढणार
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) धूम चालू असून राजकीय वारे जोमाने वाहू लागत आहेत. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांनी काही जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तर आपल्या उमेदवारांची पहिली यादी 23 ऑक्टोबर रोजीच जाहीर केली आहे. दरम्यान, आजदेखील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्याचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी उद्या सकाळी 8 वाजता येणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी उद्या सकाळी येणार
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची एबीपी माझाला माहिती
परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार
शिवसेना ठाकरे गटाकडून अखेर परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना एबी फॉर्म उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे
परांडा विधानसभा मतदारसंघात रणजीत पाटील यांना काल पहिल्या शिवसेना ठाकरे गटाच्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली
काँग्रेस चे आबा बागुल जयंत पाटील यांच्या भेटीला
काँग्रेस चे आबा बागुल जयंत पाटील यांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आबा बागुल दाखल
आबा बागुल पर्वती विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत
जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासोबत आबा बागुल करणार चर्चा
पर्वती मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अश्विनी कदम यांचे नाव चर्चेत असताना आबा बागुल यांची ही भेट महत्त्वाची ठरू शकते
काँग्रेसची 48 जागांची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेत्यांना संधी
काँग्रेसची 48 जागांची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेत्यांना संधी
नाना पटोले, बाळासाहेब पाटील अन् पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी
कसब्यातून रविंद्र धंगेकर यांना पुन्हा संधी
सुधीर साळवी यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज
सुधीर साळवी यांना शिवडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज
लालबाग मध्ये सुधीर साळवी यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी, लवकरात लवकर सुधीर साळवी यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी कार्यकर्त्यांची विनंती