Maharashtra Breaking 23rd July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 23rd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 22nd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार, नोकरदार वर्गापासून बड्या उद्योजकांचं बजेटकडे लक्ष
2. सकाळी 11 वाजता देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार याकडे राज्याचं लक्ष
3. आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वाचं लक्ष, शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याकडे लक्ष
4. देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानावरील भाजपच्या बैठकीत आरक्षणावर चर्चा, विधानसभेला आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळावा याचं नियोजन झाल्याची माहिती
5. राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निकालाकडे दोन्ही गटातील आमदारांचं लक्ष
Pooja Khedkar : पूजा खेडकरांना मसुरीला हजर राहण्याची मुदत आज संपणार
Pooja Khedkar : पुजा खेडकर यांना मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी युपीएससीने दिलेली मुदत आज संपतेय. त्यामुळे पुजा खेडकर आज मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात पोहचणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पुजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी केलेले गैरप्रकार समोर आल्यानंतर युपीएससीने त्यांच प्रशिक्षण थांबवलं आणि 23 जुलैपर्यंत मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याचे त्यांना आदेश दिले. मात्र, वाशीम मधुन निघाल्यावर पुजा खेडकर या गायब झाल्यात. त्या जर आज मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात पोहचल्या नाहीत तर तु पी एस सी कडून पुढील कारवाईला सुरुवात होऊ शकते.
Kolhapur: कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल
Kolhapur: कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीकडे जात आहे. त्यामुळेच सर्वात आधी पूर बाधित होणाऱ्या चिखली गावातील नागरिक स्थलांतरित होण्यास सुरुवात झाली आहे. 2019 साली आलेल्या महापुरामध्ये जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा चिखलीतील ग्रामस्थांनी पहिल्यांदा आपली जनावर स्थलांतरित करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर प्रापंचिक साहित्य घेऊन चिखलीतील ग्रामस्थ नवीन चिखलीमध्ये राहायला जाणार आहेत.























