Maharashtra News Live Updates : नाशिकच्या मेळाव्यात 'मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले' आशयाचे बॅनर
Maharashtra News Live Updates 23 August 2024 : राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व घडामोडींच्या अपटेड्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेतेमंडळी जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करण्यासाठी सभा, मेळावे, रॅली आयोजित करत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचेही पेव फुटले आहे. दुसरीकडे बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या तसेच आंतरराष्ट्रीय, देश, राज्य पातळीवरील सर्व घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Nashik Congress Melava नाशिकच्या मेळाव्यात 'मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले' आशयाचे बॅनर
नाशिक- नाशिकच्या मेळाव्यात आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले अशा आशयाचे बॅनर घेऊन घोषणाबाजी...
- नाना पटोले भाषणाला उभे राहिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले असे बॅनर दाखवण्यात आले
- काँग्रेस कार्यकर्त्याच्या हातात "उध्दव ठाकरे म्हणतात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे आणि नाना पटोले कार्यकर्त्यांची भावना" असे आशयाचे बॅनर...
- महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सध्या आघाडीच्या वर्तुळात सुरू असताना हा बॅनर चर्चेचा विषय ठरतोय...
Pune Protest : पुण्यात आज सर्वपक्षीय आंदोलन, महिला अत्याचारांमुळे राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे : पुण्यात आज सर्वपक्षीय आंदोलन
राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये होणाऱ्या वाढीविरोधात पुण्यात सर्वपक्षीय एकटवले
बदलापूर प्रकरण यासह राज्यातील महिला असुरक्षिततेबाबत प्रश्न विचारत पुण्यातील कोथरूड येथे सर्वपक्षीय आंदोलनाला सुरुवात
राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Sharad Pawar : पुणे महापालिका आयुक्त, मुख्य बांधकाम अभियंता शरद पवारांच्या भेटीला
पुणे : पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र नभोसले आणि मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे शरद पवारांच्या भेटीला
नदीसुधार प्रकल्प आणि पुण्यातील इतर प्रकल्पांची माहिती देण्यासाठी आणि त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट
पुण्यात नुकत्याच झालेल्या
Palghar CPM Protest : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून विविध मागण्यांसाठी पालघरमध्ये रास्ता रोको
पालघर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा आज रास्ता रोको
पालघरच्या चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी सीपीएम आक्रमक
चारोटीसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप
शेकडो पोलिसांचा चारोटी येथे बंदोबस्त तैनात असून रास्ता रोकोला सुरुवात होणार
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आता 5 सप्टेंबरला सुनावणी
आप पक्षाचे नेते अरविंद केजरिवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. एक केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. तर दुसरी याचिका अंतरिम जामीनासाठी दाखल केली आहे.
आज पार पडलेल्या सुनावणीत सीबीआयने केजरीवाल यांनी त्यांची अटक बेकायदेशीर आहे, असा दावा केला आहे त्यावर आम्ही उत्तर सादर केलं आहे मात्र, अंतरिम जामिनावर आम्ही उत्तर सादर केलेले नाही. ते लवकरच सादर करू, असं म्हणत वेळ मागितला होता.
यावर केजरिवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने या सर्व प्रकरणावर ५ सप्टेंबरला सुनावणी घेऊ असं सांगत आज होणारी सुनावणी पुढं ढकलली आहे…