Maharashtra News Live Updates 21 Sep 2024: मान्सूनचा मुक्काम राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राहणार, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता - IMD
Maharashtra News Live Updates 21 September 2024: राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

Background
Maharashtra News Live Updates 21 September 2024: : देशासह राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या दृष्टीन राज्यातील राजकीय पक्षांनी हालचाली चालू केल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सध्या बैठकांचे सत्र चालू आहे. या बैठकांत जागावाटपाची चर्चा केली जात आहे. लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर....
Parbhani Rain : परभणीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, उरले सुरले पिकही हातातून जाण्याची शक्यता
Parbhani Rain : परभणीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस
उरले सुरले पिकही हातुन जाण्याची शक्यता
परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.मागच्या १ तासापासून परभणी,मानवत,पाथरी या ३ तालुक्यांसह इतर भागात जोरदार पाऊस सुरू आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालीय तसेच दोन दिवसांच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात ऐन काढणीच्या मोसमातील आलेल सोयाबीन हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Shirdi : शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलला आग, आग बुजविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू
शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलला आग,
आग बुजविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू
शिर्डी येथील मारी गोल्ड हॉटेलला अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.
आग लागल्याचे समजताच हॉटेलमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेलचे बाहेर आले..
आग लागल्याची माहिती मिळतात शिर्डी अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग बुजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
मात्र अग्निशमन दलाने आग बुजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे.
घटनास्थळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे. आग लागण्याचे कारण मात्र अजूनही समजू शकले नाही.























