(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 17th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...
LIVE
Background
Maharashtra Breaking 17th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आज ठरणार, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज विस्तारित बैठक, अमित शहा, जेपी नड्डांसह सर्व राष्ट्रीय पदाधिकारी राहणार उपस्थित
2. पुण्यात 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभाचा आज राज्यस्तरीय शुभारंभ, एका क्लिकवर जमा होणार एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये
3. लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीत भव्य सोहळा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद
4. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरुन आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप, उद्या सकाळी 6 पर्यंत ओपीडी सेवा बंद राहणार
5. रामगिरी महाराजांचं मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पडसाद, 2 ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही रामगिरी वक्तव्यावर ठाम
Amravati News : रिमझिम पावसात लाडक्या बहिणी पैसे काढायला रांगेत
Amravati News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे. तेच पैसे काढण्यासाठी आता बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. अमरावती शहरातील श्याम चौक येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर तर रिमझिम पावसात महिलांच्या रांगा लागल्या आहेत. शहरातील प्रत्येक बँकेत हीच स्थिती पाहायला मिळत आहे. या जोजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींनी सरकारचे आभार मानले.
Nanded : नांदेड बंद नागरिकांचा बंदला चांगला पाठिंबा
Nanded : बांगलादेश मध्ये हिंदू लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे नांदेड मध्ये बंदचे आयोजन करण्यात आले सकाळ पासून नांदेड मध्ये नागरिकांनी चांगला पाठिंबा दिल्याचे पाहिला मिळत आहे व्यापाऱ्यांनी आपले आस्थापना बंद ठेवत पाठिंबा दिला आहे.
Pune News : कोलकत्तातील घटनेच्या निषेधार्थ बारामतीमधील डॉक्टरांनी काढला तहसील कार्यालावर मूक मोर्चा
Pune News : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह डॉक्टरांच्या संघटनांनी २४ तासांचा बंद पुकारला असून,आज बारामती मधील डॉक्टरांच्या संघटनेने शहरातून तहसील कार्यालयापर्यत मूक मोर्चा काढला.. यावेळी डॉक्टरांच्या संरक्षणार्थ कडक कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली.
Dhule News : बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं धुळे बंदची हाक
Dhule News : बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं धुळे बंदची हाक देण्यात आली आहे, या धुळे बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून शहरातील मुख्य बाजारपेठ असणारा आग्रा रोड आज पूर्णतः बंद आहे.. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त देखील परिणाम केला असून नागरिकांनी शांततेत बंद पाळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे... रिक्षा चालकांनी देखील या बंदला प्रतिसाद देत रस्त्यावर रिक्षा न काढण्याचा निर्णय घेतला असून धुळे बंदला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतला आहे