Maharashtra Breaking LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अडकवण्याचा करण्याचा प्रयत्न, परमबीर सिंह यांचा खळबळजनक दावा
Maharashtra Breaking 10th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी आपापल्या यात्रा चालू केल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष राज्यातील महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर विरोधक राज्यातील नोकरी, उद्योग, शेतीप्रश्नांवर सरकारला वेगवेगळ्या सभा, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून घेरत आहेत. दुसरीकडे केंद्रात वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आले असून या विधेयकावर सर्वांगीण चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या विधेयकामुळे केंद्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
ठाकरे गटाच्या नेत्या संगिता चव्हाण यांचा पक्षाला रामराम, अंधारेंवर आरोप करत सोडचिठ्ठी
महिला आयोगाच्या सदस्य तथा शिवसेना उबाठाच्या नेत्या संगिता चव्हाण यांचा पक्षाला रामराम
अंधारेंवर आरोप करत पक्षाला दिली सोडचिठ्ठी
महिला आयोगाच्या सदस्य तथा शिवसेना उबाठाच्या नेत्या संगिता चव्हाण यांचा पक्षाला रामराम ठोकलाय.
यावेळी त्यांनी शिवसेना उभा टागटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
आमदारांमुळे शिवसेना नाही तर अंधारसेना झाली आहे असे त्या म्हणाल्या आहेत.
पुण्यातील विश्रांतवाडी मध्ये 1 कोटी रुपये किमतीचे सापडल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
पुणे ड्रग्स प्रकरण पुण्यातील विश्रांतवाडी मध्ये 1 कोटी रुपये किमतीचे सापडल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम तातडीने मुंबईकडे रवाना
अटक केलेल्या तीन आरोपींकडून चौकशीत मोठी माहिती उघड
ड्रग्स प्रकरणाच मुंबई कनेक्शन निघण्याची शक्यता
पुणे पोलीस तातडीने तापसासाठी मुंबईकडे रवाना























