Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच राज्यातील मान्सूनचे सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील घडामोडींसोबतच राज्यातील मान्सून, क्रीडा, मनोरंजनविषय घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जाईल...
वैष्णवी हगवणे प्रकरणात आज न्यायालयात (Court) जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला. आरोपी हगवणे कुटुंबातील पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता, पुणे (Pune) न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे. मात्र, न्यायालयात आरोपींच्या वकिलाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप होत आहे. त्यावर, आता हगवणेंचे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी, आम्ही वैष्णवीचं (Vaishnavi hagawane) कुठलंही चारित्र्यहनन केलेलं नाही. केवळ सत्य बाजू न्यायालयासमोर मांडण्यात आली, असे दुषिंग यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी वकिलांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यामध्ये, वैष्णवीचे ज्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होते त्या व्यक्तीचा 19 मे रोजी साखरपुडा झाला असून न्यायालयात आम्ही ही माहिती दिल्याचेही त्यांनी म्हटले.
राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची भर
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 383 वर पोहोचली आहे. बुधवारी राज्यात कोरोनामुळे कुणाचाही मृ्त्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
ऐन मे महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, अवकाळी पावसाने पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढली
AR: नांदेडसह शेजारच्या हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने बरसलेल्या अवकाळी पावसामुळे पैनगंगा नदी प्रवाहित झालीय, त्यामुळे इस्लापुर जवळ असलेला सहस्त्रकुंड इथला नदीवरचा नैसर्गिक धबधबा प्रवाहित झालाय. ऐन मे महिन्यात धबधबा प्रवाहित होण्याची ही गेल्या अनेक वर्षातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले आता सहस्त्रकुंड कडे वळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्या विभागातून पैसे वर्ग केले असतील त्यांना तो निधी पुन्हा देण्यात येणार : प्रकाश आबिटकर
प्रकाश आबिटकर ऑन कोरोना
आरोग्य विभाग सर्वच आजाराच्या बाबतीत सतर्क आहे
कोणत्याही आजाराबाबत लक्ष न वाढत असतील तर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे
कोरोना रुग्णांचा संकेत महिन्याभरात देशभरात रुग्णांची संख्या वाढते त्यामुळे नागरिकांकडून विचारणा केली जाते
पूर्वी कोरोना बाबत आपण घाबरून जात होतो पण आता नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही
कोरोनाचे लक्षण देखील सौम्य आहे मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे
विविध आजार असलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची केंद्राच्या आरोग्य विभागाशी सातत्याने संपर्क आहे
आताच्या कोरोना बाबत केंद्राने सौम्य लक्षण आहेत असं सांगितला आहे लोकांना पॅनिक होऊ देऊ नका अशा सूचना केंद्राने दिल्या
नागरिकांनी कुठेही त्यांनी होऊन जाण्याची गरज नाही आरोग्याची काळजी घ्यावी
कोरोनाची आकडेवारी लपवण्याची गरज नाही मात्र वस्तुस्थिती देखील लोकांसमोर सांगणं गरजेचं आहे
तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता कोरोना सर्दी ताप खोकला याप्रमाणे आपल्या सोबत राहील
स्वाइन फ्लू सारखी सुद्धा लक्षण आत्ताच्या कोरोनामध्ये नाहीत
कोणत्याही आजाराचे पेशंट वाढले तर डॉक्टरांना सूचना दिल्या जातात
------------
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ऑन जळगाव प्रसूती
कालची घटना ही खेदजनक आहे यामध्ये जर आमच्याकडून काही दिरंगाई झाली असेल तर त्याची चौकशी होणार
शहरातच नव्हे तर खेडोपाड्यात वाड्या वस्त्यांवर सर्वसामान्यांच्या दारात आरोग्य यंत्रणा पोहोचली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत
प्रकाश आबिटकर ऑन डॉक्टर व्हिडिओ
समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणारा व्हिडिओ डॉक्टरचा व्हिडिओ मी सध्या पाहिलेला नाही पण तो पाहूनच त्याच्यावर बोलणं उचित ठरेल
प्रकाश आबिटकर ऑन लाडकी योजना
लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात पैसा द्यावा लागतो त्यामुळे ज्या ज्या विभागातून पैसे वर्ग केले असतील त्यांना तो निधी पुन्हा देण्यात येणार आहे


















