Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विविध अपडेट्स समोर येत आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी अद्यापही काश्मीरच्या जंगलात लपून बसल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलली जात आहे. यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...
राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
राज्यातील काही भागात पुढील ३-४ दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
विदर्भात काही भागात ५०-६० किमी प्रति तासाने वेगाने वारे वाहण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
नाशिकमध्ये उष्माघाताने शेतकर्याचा मृत्यू, शेतात काम करतांना शेतकऱ्याला आली होती भुरळ
- नाशिकमध्ये उष्माघाताने शेतकर्याचा मृत्यू, शेतात काम करतांना शेतकऱ्याला आली होती भुरळ...
- नाशिक जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कडक उन्हामुळे नाशिककर हैराण...
- नाशिक जिल्ह्यातील शेवगे दारणा येथील घटना, जगदीश रघूनाथ कासार वय ४५ असे मृत शेतकऱ्याचे नाव......
- शेतात पाइपलाइन दुरुस्त करताना शेतकर्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...
- शेतकऱ्याला शेतात काम करताना चक्कर आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित ...
- नाशिक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार, नाशिककरांना जाणवतेय उष्णतेची तीव्र झळ























