Maharashtra Breaking LIVE Updates: पनवेलमध्ये सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून; आरोपी एका तासात पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Breaking LIVE Updates:देश-विदेशातील, गावा-खेड्यातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील, गावा-खेड्यातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...
MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही; जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणी
राज्यातील अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात असून बळीराजाची पुण्यात, मुंबईत (Mumbai) असलेली लेकरंही व्याकुळ झाली आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी पोरं, पोरी आपल्या आई-बापांचे होणारे हाल, आपल्या शेवारात पसरलेल्या पाण्याचे व्हिडिओ पाहून हवालदिल झाले आहेत. अर्थातच, एमपीएससीची परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, या गावाकडील संकटांचं ओझं घेऊन परीक्षेला बसावं लागणार आहे. मात्र, आता एमपीएससीची (MPSC) ही परीक्षा (Exam) पुढे ढकलावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी केली आहे. येत्या 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही, असे पाटील यांनी म्हटलं.
पूरग्रस्तांच्या मदतीला बाप्पा, लालबागचा राजा मंडळाकडून मोठा चेक; शिक्षक 1 दिवसाचा पगार देणार, पारलिंगीही सरसावले
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Rain) शेतकऱ्यांचं अनोतान नुकसान झालं आहे. शेतातील पिकांसह माती आणि जनावरंही वाहून गेली आहेत. त्यामुळे, बळीराजावरील या संकटात आता माणूसकीचा आधार देण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ 2215 कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली असून पुढील काही दिवसांत ही मदत शेतकऱ्यांपुढे पोहोचेल असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे आता मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही शेतकऱ्यांना (Farmers) मदत केली जात आहे. राज्यातील सर्वपक्षीय विद्यमान आमदार, खासदार यांनी आपले 1 महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देऊ केले असून सरकारी कर्मचारीही एक दिवसाचा पगार देणार आहेत. आता, लालबागचा राजा (Lalbaugcha raje) सार्वजनिक गणेश मंडळानेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात दिला आहे.
पनवेलमध्ये सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून; आरोपी एका तासात पोलिसांच्या ताब्यात
पनवेल : शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्ख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मृत दत्तु वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरून आरोपी नागेश वाल्या काळे (वय 28) याने दगडाने ठेचून भावाचा खून केला. यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी वाल्या काळेला पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
मालेगाव तालुक्यात मंत्री दादा भुसे यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा
मालेगाव : तालुक्यातील माळमाथा करंजगव्हाण आणि अस्ताने परिसरात अतिवृष्टीमुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान पाहण्यासाठी मंत्री दादा भुसे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या भागात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत भुसे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य जनतेचे झालेले नुकसानीची एनडीआरएफ च्या निकषानुसार शासनाकडून भरपाई दिली जाईल, असे आश्वासनही मंत्री भुसे यांनी दिले.दरम्यान, नुकसान पंचनामे शासनाकडे पोहोचत असून आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
























