BJP : उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला
BJP Reaction On Uddhav Thackeray Statement : राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
![BJP : उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला maharashtra bjp reply to shivsena uddhav thackeray on assembly election result maharashtra politics marathi news BJP : उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/03/2d92932dddca475fd977a945bb97248d1701600975681720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि इतर राज्यात भाजप (BJP) जिंकली की इव्हीएमवर शंका अशी टीका करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता किती रडारड करणार असा सवाल भाजपने (Maharashtra BJP) विचारला आहे. उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? असाही सवाल भाजपने उद्धव ठाकरे यांना केला. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला आता भाजपने उत्तर दिलं आहे.
काय म्हणालं भाजप?
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता 22 जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे.
कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 5, 2023
राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही…
उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
पाच राज्यांचा निकाल लागला या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला खुले आवाहन दिले. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असे देखील ते या वेळी म्हणाले. सरकारला आणि गौतम अदानी यांना जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबर धारावीहून अदानींच्या कार्यालायावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)