Dr. Babasaheb Ambedkar : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कधी होणार? आतापर्यंत किती काम पूर्ण झाले?
Dadar Indu Mill Dr. Babasaheb Ambedkar Smarak : इंदू मिलमधील स्मारकाचे काम हे 2018 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. आताही त्याचे केवळ 35 टक्के काम पूर्ण झालं आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. मुंबईतील इंदू मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काम कधी होणार आणि सर्वसामान्यांना हे स्मारक कधी पाहता येणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे.
दादरमधील इंदू मिलमधील 4.84 हेक्टर जागेवर राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात येत आहे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूमीपूजनानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. काही कारणांमुळे कंत्राटदारास कार्यादेश देण्यास विलंब झाला. परिणामी स्मारकाचे काम सुरू होण्यासही विलंब झाला.या स्मारकाचे काम 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. एमएमआरडीएने आता स्मारकाच्या कामाला वेग दिलाय .
स्मारकाची वैशिष्ट्ये (Dadar Indu Mill Dr. Babasaheb Ambedkar Smarak)
- इंदू मिलच्या परिसरातील तळ्याची सुधारणा आणि सुशोभिकरण करून महाडच्या चवदार तळ्याची प्रतिकृती साकारली जाणार.
- स्मारक इमारतीच्या पाठपीठामध्ये बौद्ध वास्तूरचना शैलीतील घुमट, चैत्यसभागृह, संग्रहालय असेल. तसेच यात प्रदर्शन भरविण्याची सोय असेल.
- पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी पादपीठात 6 मीटर रुंदीचा आंतरिक आणि बाह्य चक्राकार मार्ग प्रस्तावित आहे. यामध्ये विविध कलाकृती साकारल्या जाणार आहेत.
- 1000 नागरिक बसण्याच्या क्षमतेचे प्रेक्षागृहाची उभारणी. आर्ट गॅलरी.
- 100 आसनी क्षमतेचे 4 संशोधन केंद्र वर्ग.
- संशोधन केंद्रात सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी.
- विपश्यना केंद्र.
- परिक्रमापथ असणार आहे.
या स्मारकाचे आतापर्यंत काम किती पूर्ण झालं? (Dadar Indu Mill Dr. Babasaheb Ambedkar Smarak)
या स्मारकाचे आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.
- स्मारकातील बांधकाम 52 टक्के
- वाहनतळाचे 95 टक्के.
- प्रवेशद्वाराचे 80 टक्के.
- सभागृहाचे 70 टक्के.
- ग्रंथालयाचे 75 टक्के.
- प्रेक्षागृहाचे 55 टक्के.
- स्मारक इमारतीचे 45 टक्के असे काम पूर्ण झाले आहे.
एकूण 1089.95 कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम 2024 मध्ये पूर्ण होईल असे एमएमआरडीएच्या सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र पुतळ्याच्या कामास आता सुरूवात झाली असून ते पूर्ण होण्यास काहीसा काळ लागणार आहे. त्यामुळे हे स्मारक आता मे 2026 मध्ये पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: