तो आला, त्यानं पाहिलं अन्... 20 फूट खोल खड्ड्यात पडलेल्या नागाला सर्पमित्राकडून जीवनदान
Bhiwandi News : तो आला, त्यानं पाहिलं अन् थेट 20 फूट खड्ड्यात उतरुन जीवनदान दिलं, पण कसं तर जेसीबीच्या बकेटमध्ये बसून. ही गोष्ट आहे भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावच्या हद्दीतील. एका सर्पमित्रानं जेसीबीच्या खोऱ्यात बसून कोब्रा नागाला वाचवलंय.
Bhiwandi News : ग्रामीण भागात शेती आणि जंगल नष्ट करून त्या ठिकाणी मोठंमोठे गृह संकुल आमि कंपन्या उभारण्यात येत आहेत. त्यामुळे नैसर्गिक सुबत्ता नष्ट होत आहे. अशातच अनेक जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये आल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार भिवंडीमध्ये घडला. एका कंपनीचं काम सुरु असताना भल्यामोठ्या 20 फूट खोल खड्यात कोब्रा नाग पडला. मात्र त्या एवढ्या खोल खड्ड्यातून नागाला बाहेर काढायचं कसा? हा प्रश्नच होता. अशातच एका सर्पमित्रानं पुढे येऊन 20 फूट खोल खड्ड्यातून कोब्रा नागाला बाहेर काढलं (Bhiwandi Snake Rescue). पण कसं? तर जेसीबीच्या मदतीनं. सर्पमित्रानं जेसीबीच्या बकेटमध्ये बसून 20 फूट खोल खड्ड्यात उतरून त्या 'कोब्रा' नागाला वाचवलं आणि त्याला जीवदान दिलं.
24 तास खड्डयांत अडकून होता कोब्रा नाग
भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील पिंपळास गावच्या हद्दीत भूमी वर्ल्ड नावाने व्यापारी संकुल आहे. या संकुलात नव्यानं कंपनी उभारण्याचं काम सुरु आहे. या ठिकाणी पाया उभारण्यासाठी मोठेमोठे खोल खड्डे जेसीबीच्या साहाय्यानं करण्याचं काम सुरु होतं. असं असतानाच काल सायंकाळच्या सुमाराला एका भल्यामोठ्या साचलेल्या पाण्यातील खड्यात कोब्रा नाग कामगाराला दिसला होता. त्यानं नागाची माहिती साईट सुपरवायझरला दिली. एवढंच नाहीतर त्या नागाला स्वतःहून बाहेर पडता यावं म्हणून त्यांनी बांबू आणि शिडी लावली. मात्र तो कोब्रा नाग दुसऱ्या दिवशी सकाळीही त्याच खड्यात अडकून पडल्याचं दिसलं.
पाहा व्हिडीओ : 20 फूट खोल खड्ड्यात पडलेल्या नागाला सर्पमित्राने दिलं जीवनदान
त्यानंतर, सर्पमित्र हितेशला या घटनेची माहिती साईट सुपरवायझरनं दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेशनं घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यातून सापाला बाहेर काढायचं कसं? हा मोठा प्रश्नच होता. अशातच या कोब्रा नागाला वाचवण्यासाठी तो चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून 20 फूट खोल खड्यात उतरला. काही वेळातच या कोब्रा नागाला सर्पमित्रानं शिताफीनं पकडून बाहेर काढून पिशवीत बंद केलं. हा इंडियन कोब्रा जातीचा नाग असून 4 फूट लांबीचा आहे. या नागाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीनं निर्सगाच्या सानिध्यात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश यानं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :