मंत्री धनंजय मुंडेंची परळीतल्या हरिनाम सप्ताहात उपस्थिती, पारावरच्या पंगतीत घेतला काल्याचा प्रसाद
Dhananjay Munde : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील सोमवारी एका अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी गाव पारावार बसून गावकऱ्यांसोबत पंगतीत बसुन जेवण केलं.
Dhananjay Munde, Maharashtra Cabinet Minister : महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने मुहूर्तमेढ रोवलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा खेडोपाडीच नव्हे तर शहरात देखील जोपासली जाते. येथे सर्व लहान-थोर एकत्र येऊन हरिनाम गातात व एकत्रित काल्याचा प्रसाद ग्रहण करतात. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील सोमवारी एका अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी गाव पारावार बसून गावकऱ्यांसोबत पंगतीत बसुन जेवण केलं.
झाले असे की, धनंजय मुंडे यांच्या मूळ जन्मगाव नाथ्रा ता. परळी येथे पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताहाचा सोमवारी काल्याचा कीर्तनाने शेवट झाला. यावेळी बालयोगी ह. भ. प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या अमृतवाणीतून भाविकांनी काल्याचा आंनद घेतला. यावेळी धनंजय मुंडे यांनी गावातील सप्ताहात हजेरी लावत हरिहर महाराजांचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे यांनी गावकऱ्यांसोबत गाव पारावार (गावातील मंदिर) पंगतीला बसून प्रसाद घेत जेवणही केले.
मी कितीही मोठा झालो तरी, इथल्या माणसांमध्ये सदैव वावरता यावे व कायम जमिनीवरच पाय राहावेत, अशी प्रार्थना धनंजय मुंडे हे नेहमी आपल्या भाषणांतून करत असतात. त्याची सोमवारी प्रचितीच जणू आली. यावेळी मा. आ. केशवराव आंधळे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, सरपंच सचिन मुंडे, सेवा सोसायटीचे चेअरमन अतुल मुंडे यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या:
- उत्तराखंडमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेस-भाजप की आप, यंदा आकडे कुणाच्या बाजूने?
- UP Election 2022: पंतप्रधान मोदी प्रचारासाठी रणांगणात, उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आज सभा
- Uttarakhand Election : मोफत वीज, रोजगार भत्त्यासह महिलांना निधी देणार, उत्तराखंडमध्ये केजरीवाल यांच्या मोठ्या घोषणा
- UP Election: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी राज? भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये चुरशीची लढत
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live