UP Election: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी राज? भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये चुरशीची लढत
ABP CVoter Survey for UP Election 2022: एबीपी न्यूजच्या सी वोटर सर्व्हेच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये प्रमुख लढत आहे.
लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला अवघे काही तास राहिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्य लढत ही भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये असून भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 41.2 टक्के मतं तर समाजवादी पक्षाला 35 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूजने केलेल्या सी वोटर सर्व्हेमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपी माझाने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी राज येण्याची शक्यता असल्याचं दिसून आलं आहे. या सर्व्हेनुसार, भाजपला 225-237 जागा मिळण्याची शक्यता आहे तर समाजवादी पक्षाला 139-151 टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला 13-21 तर काँग्रेसला केवळ 4-8 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.
उत्तर प्रदेशात कुणाला किती जागा?
पक्ष | एकूण जागा - 403 |
भाजप | 225ते 237 |
सपा | 139 ते 151 |
बसपा | 13 ते 21 |
काँग्रेस | 4 ते 8 |
इतर | 2 ते 6 |
या सर्व्हेनुसार, भाजपला 41.2 टक्के मतं तर समाजवादी पक्षाला 35 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. मायावतींच्या बसपाला 14.2 टक्के मतं तर काँग्रेसला 7 टक्के मतं आणि इतर पक्षांना 2.6 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?
उत्तर प्रदेश | मतांची टक्केवारी |
भाजप+ | 41.2 |
सपा + | 35 |
बसपा | 14.2 |
काँग्रेस | 7.0 |
इतर | 2.6 |
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील एकूण 403 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा 10 फेब्रुवारीला असणार आहे. त्यानंतर 14, 20, 23, 27 फेब्रुवारी त्यानंतर 3 आणि 7 मार्च अशी सात टप्प्यांत मतदान प्रकिर्या पार पडणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे
सूचना : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा प्रचार वेगाने सुरु आहे. ओपिनियन पोल सी-वोटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील 1 लाख 36 हजारपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला आहे. 690 मतदारसंघामध्ये याबाबतचा अभ्यास केला. हा सर्व्हे 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकष सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.
महत्त्वाच्या बातम्या: