एक्स्प्लोर

Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, शेतकरी प्रश्नांसह महागाईच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होणार

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Assembly Budget Session) आज पाचवा दिवस आहे. आज विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Budget Session : विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Assembly Budget Session) आज पाचवा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उत्तर देणार आहेत. दरम्यान, मागील चार दिवसात विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरुन  विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक

शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काल (2 मार्च)  विधानभवनात (Vidhan Bhavan) सत्ताधारी आक्रमक झाले होते. याबाबत विधिमंडळाची हक्कभंग समिती स्थापन झाली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु आहे आणि त्यासाठी आता विधीमंडळ हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये राहुल कुल समितीचे प्रमुख असणार आहेत आणि कुल यांच्या अध्यक्षतेखालील 15 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. 

नेमकं काय म्हणाले होते राऊत? 

संजय राऊतांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून 'चोर'मंडळ आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्यांनी पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्ही अशी पदं ओवाळून टाकतो, असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना आणि भाजपवर घणाघात केला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर विधीमंडळ सभागृह आणि बाहेर सत्ताधारी राऊतांच्या विरोधात आक्रमक झाले होते.

राम सातपुतेंच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक

आधीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु असताना, भाजप आमदार राम सातपुते यांच्या एका वक्तव्याने दुसरा वाद निर्माण झाला. सभागृहात बोलत असताना राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. अजित पवारांनीही राम सातपुते यांच्या माफीची मागणी केली. अकेर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वाद मिटला. मात्र, राम सातपुते यांच्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या:

Pradnya Rajeev Satav: दारु माफियांच्या सांगण्यावरुन माझ्यावर हल्ला, आमदार प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषदेत आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget